भारताच्या हद्दीत घुसली पाकिस्तानी विमाने; टाकले बॉम्ब

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

श्रीनगर : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आहे. 

श्रीनगर : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आहे. 

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यांनी नौशेरा, पुँच, राजौरी येथे बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. भारताकडून पाकिस्तानच्या विमानांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकूण तीन विमाने भारतीय हद्दीत आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघऩ केले आहे.

भारतीय हवाई दलाच्या 'मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले होते. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला होता. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही बदला घेतला जाईल असे म्हटले होते. त्यानुसार, पाकिस्तानने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

WebTitle : marathi news pakistani fighter planes entered indian territories  


संबंधित बातम्या

Saam TV Live