Air Strike By India : भारतीय हवाई दलाला पाहून पाकिस्तानी विमाने पळाली

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

श्रीनगर : भारताच्या हद्दीत आलेली पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हवाई दल सतर्क होताच पळून गेल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब टाकल्याचेही वृत्त आहे.

भारताच्या हद्दीत घुसली पाकिस्तानी विमाने; टाकले बॉम्ब

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यांनी नौशेरा, पुँच, राजौरी येथे बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावल्याचे कळत आहे. एकूण तीन विमाने भारतीय हद्दीत आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे.

पाकिस्तानी विमाने घुसल्याने प्रवासी विमानांची वाहतूक बंद
पाकिस्तानमध्ये हल्ला केल्यानंतर भारतीय हवाई दल सतर्क होते. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी विमानांची घुसखोरी पाहून लगेच प्रत्युत्तर दिले. पण, तोपर्यंत पाकिस्तानी विमाने माघारी पळून गेली होती. पाकिस्तानी विमानांनी जाताना बॉम्ब टाकल्याचीही माहिती आहे.

WebTitle : marathi news pakistani fighter planes ran after seeing alert Indian forces 

संबंधित बातम्या

Saam TV Live