पाकिस्तानी तरूणांचा हनीट्रॅप; तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाकिस्तानी तर नाहीत ना..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

कितीही नांगी ठेचली तरी पाकिस्तानची मुजोरी संपलेली नाही. एअर स्टाईकनंतर जगात नाच्चकी झालेला पाकिस्तान आता भारतीय तरूणांना जाळ्यात ओढण्यासाठी हनीट्रॅप लावू पाहतोय. याचा अनुभव शिरूर तालुक्यातल्या तरूणांना आलाय. इथल्या एका व्हॉट्सऍप ग्रुपवर पाकिस्तानी युवकांनी आक्रमण केलंय. इतकच नाही तर या निर्लज्ज तरूणांनी ग्रुपवर अश्लिल व्हिडिओंचा भडिमार केलाय. अचानकपणे येणारे अश्लिल व्हिडीओ पाहून ग्रुपमधले सदस्य भांबावून गेले. बऱ्याच जणांनी ग्रुपमधून बाहेर पडले. काहींनी शोध घेतला असता अश्लिल व्हिडीओ पाठवणारे नंबर पाकिस्तानातील असल्याचं समोर आलं.

कितीही नांगी ठेचली तरी पाकिस्तानची मुजोरी संपलेली नाही. एअर स्टाईकनंतर जगात नाच्चकी झालेला पाकिस्तान आता भारतीय तरूणांना जाळ्यात ओढण्यासाठी हनीट्रॅप लावू पाहतोय. याचा अनुभव शिरूर तालुक्यातल्या तरूणांना आलाय. इथल्या एका व्हॉट्सऍप ग्रुपवर पाकिस्तानी युवकांनी आक्रमण केलंय. इतकच नाही तर या निर्लज्ज तरूणांनी ग्रुपवर अश्लिल व्हिडिओंचा भडिमार केलाय. अचानकपणे येणारे अश्लिल व्हिडीओ पाहून ग्रुपमधले सदस्य भांबावून गेले. बऱ्याच जणांनी ग्रुपमधून बाहेर पडले. काहींनी शोध घेतला असता अश्लिल व्हिडीओ पाठवणारे नंबर पाकिस्तानातील असल्याचं समोर आलं. युवती असल्याचं भासवून हे निर्लज्ज युवक शिरूरमधल्या तरूणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होते. यातल्या काही युवकांना पाकिस्तानमधून व्हिडिओ कॉल येत असून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातोय. ग्रुपच्या इनव्हाईट लिंकमधून पाकिस्तानी युवकांनी ग्रुपमध्ये प्रवेश केल्याची माहिती पुढे आलीय.

युद्धात भारत आपल्याला चिरडून टाकेल याची पाकिस्तानला जाणीव झालीय. त्यामुळेच पाकिस्तानकडून असे घाणरडे उपदव्याप सुरू झालेत. त्यामुळे भारतीय नागरिकांनी वेळीच सजग व्हायला हवं. असे अश्लील मेसेज पाठवून कुणी हनीट्रॅप लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्या. तुमची ही एक कृती देशाला मोठ्या संकटातून वाचवेल.

WebTitle : marathi news pakistani whatsapp users invaded Indian whatsapp group 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live