सरकारकडून जनतेची थट्टा सुरुच : अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 मे 2018

पुणे : पेट्रोलचे दर काही पैशांनी कमी करून सरकारने जनतेची थट्टा केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास सुरवातीच्या काळात राष्ट्रवादीची जी भूमिका होती. ती आता राहणार नाही, असेही पवार म्हणाले. 

शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबत पवार म्हणाले, सुरवातीच्या काळात भाजपला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची जी भूमिका होती, ती भूमिका आता असणार नाही. तसेच भाजपचा पाठिंबा काढून घेतला तर स्वतंत्र लढणार ही भूमिका उद्धव ठाकरेंकडून मांडली जात आहे. तसेच अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सगळे नेते भूमिका घेत असतात. त्यांना माहिती आहे, की शिवसेना आपल्यासोबत राहिली नाहीतर आपण विरोधी पक्षात हे स्पष्ट आहे. 

ते पुढे म्हणाले, पालघर पोटनिवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाले. एकमेकांचे वाभाडे काढले. उद्धव ठाकरे पाठिंबा काढून घेणार का? या प्रश्नावर आगीतून उठायचे आणि फुफाट्यात पडायचे असे कोणी करणार नाही. पालघरमध्ये आम्हाला अपयश आले, 
समविचारी एकत्र आले असते तर चित्र वेगळे राहिले असते. 2014 मध्ये मोदींचा करिष्मा दिसला होता पण तो आता नाही, मोदींबद्दल आता रोष वाढत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live