पालघरच्या निवडणुकीत हातघाईचं प्रचारयुद्ध

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर
बुधवार, 16 मे 2018

कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळंच भाजप नेते आता आव्हान प्रतिआव्हानाची भाषा करू लागलेत. महाराष्ट्रात भंडारा गोंदिया आणि पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झालीय. पालघरमध्ये शिवसेनेनं भाजपच्या श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिलीय. तर भंडाऱ्यात शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळं सत्तेतले भागीदार शिवसेना आणि भाजप आमनेसामने आहेत. कर्नाटक निवडणुकीचा संदर्भ देत भाजप नेते आशिष शेलारांनी विरोधकांना आव्हान दिलंय. आता भंडारा जिंकू ठोकून आणि पालघर  जिंकू ठासून असं म्हटलंय. आशिष शेलारांच्या टीकेनं शिवसेना चवताळलीय.

कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळंच भाजप नेते आता आव्हान प्रतिआव्हानाची भाषा करू लागलेत. महाराष्ट्रात भंडारा गोंदिया आणि पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झालीय. पालघरमध्ये शिवसेनेनं भाजपच्या श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिलीय. तर भंडाऱ्यात शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळं सत्तेतले भागीदार शिवसेना आणि भाजप आमनेसामने आहेत. कर्नाटक निवडणुकीचा संदर्भ देत भाजप नेते आशिष शेलारांनी विरोधकांना आव्हान दिलंय. आता भंडारा जिंकू ठोकून आणि पालघर  जिंकू ठासून असं म्हटलंय. आशिष शेलारांच्या टीकेनं शिवसेना चवताळलीय. कमळ गाडणार म्हणजे गाडणार असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. कर्नाटकच्या लढाईनंतर आता पालघरच्या निवडणुकीत हातघाईचं प्रचारयुद्ध रंगणार याचे संकेत मिळालेत. पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप शिवसेनेत जोरदार आरोप प्रत्यारोप होतील हे स्पष्ट झालंय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live