पालघर पोटनिवडणुकीत EVM  आणि मतदार यादीचा सावळा गोंधळ 

पालघर पोटनिवडणुकीत EVM  आणि मतदार यादीचा सावळा गोंधळ 

शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पालघर पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनचा सावळा गोंधळ सुरूच आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून संपूर्ण मतदारसंघात 80 ते 90 ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झालाय.

सायवन, कुडे, तारापूरमध्ये जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मतदारांना ताटकळत उभं राहावं लागलं. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अजूनही मशीन बदलण्याचं काम सुरू आहे. झालेल्या सदर घोळामुळे मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झालंय का घोळ झालंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

तर दुसरीकडे यादीतल्या घोळामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाहीय. पालघरमधले रहिवासी असूनही मतदार यादीत नाव नसणं, दुसऱ्यात मतदारसंघात नाव जाणं, पत्ता चुकीचा दाखवणं असे अनेक प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

अनेक ठिकाणी मतदानादरम्यान लाईट गेल्याने अंधारातच मतदान करण्याची वेळ मतदारांवर ओढवली आहे 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com