डहाणू,तलासरी, विक्रमगड, जव्हार भागात जोरदार पावसाला सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 जून 2019

पालघर जिल्हातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार या भागात जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पडणारा पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता. मात्र उशीरा का होईना पावसाने गेल्या दोन पावसापासून बॅकलॉग भरण्यास सुरुवात केलीय. 

जोरदार पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय. पावसामुळे नदी नाले ही भरून वाहू लागले आहेत. दोन दिवसांतील पावसाने पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग येथील जून महिन्याची सरासरी गाठायलाही मदत झाली. डहाणूमध्ये 24 तासांमध्ये 213 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Webtitle : marathi news palghar district rain updates 

संबंधित बातम्या

Saam TV Live