पालघरमध्ये निवडणुकीपूर्वी पैसे वाटप; सात ते आठ जण पोलिसांच्या ताब्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 मे 2018

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे काही तास शिल्लक असताना मतदारांसाठी लक्ष्मीदर्शन सुरू झालंय. पालघरच्या रानशेत गावात मतदारांना पैसे वाटताना सात ते आठ जणांना पकडण्यात आलंय. हे कार्यकर्ते भाजपचा असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यांच्याकडून अनेक लिफाफे जप्त करण्यात आले असून या लिफाफ्य़ांमध्ये प्रत्येकी दीड हजार रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याला पकडलं असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे काही तास शिल्लक असताना मतदारांसाठी लक्ष्मीदर्शन सुरू झालंय. पालघरच्या रानशेत गावात मतदारांना पैसे वाटताना सात ते आठ जणांना पकडण्यात आलंय. हे कार्यकर्ते भाजपचा असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यांच्याकडून अनेक लिफाफे जप्त करण्यात आले असून या लिफाफ्य़ांमध्ये प्रत्येकी दीड हजार रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याला पकडलं असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. आदिवासी पाड्यांवरील अंगणवाडीत जाऊन प्रत्येक मतदाराला तो दीड हजारांचं पाकीट देत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live