राजेंद्र गावित यांनी आज केला शिवसेनेत प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मार्च 2019

पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राजेंद्र गावित यांनाच पालघर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित करण्यात आली असून पालघर लोकसभेसाठी युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पालघरमधून राजेंद्र गावित हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. तर श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राजेंद्र गावित हे आता पालघरमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. पण श्रीनिवास वनगा यांना विधीमंडळात पाठवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

वास्तविक पालघरची लोकसभेची जागा ही भाजपच्या वाटेला राहिलेली आहे. दिवंगत खासदार चिंतामन वनगा हे भाजपचे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर मात्र येथील गणितच बदलले. वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर गावित यांना कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यात आले होते. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. यावेळी राजेंद्र गावित निवडून आले होते.

Web Title: Rajendra gavit join shiv sena candidacy for palghar lok sabha election

संबंधित बातम्या

Saam TV Live