VIDEO | पंकजा मुंडेंचा भाजप नेतृत्वाला इशारा, म्हणे बंड नाही वेगळी चूल

तुषार रुपनवर, माधव सावरगावे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी बंड केलं नाही मात्र एक प्रकारे त्यांनी वेगळी चूल मांडण्याचे संकेत गोपीनाथ गडावरुन दिलेत.

 मी पक्ष सोडणार नाही,पक्षानं काय निर्णय घ्यवा , गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडेंनी पक्ष नेतृत्त्वाला असं थेट आव्हान दिलं. नेतृत्वाला आव्हान देत पंकजा मुंडेंनी आपल्या राज्य दौऱ्याची घोषणा केली

दौऱ्याची घोषणा केली
पंकजा मुंडें इथच थांबल्या नाहीत तर त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीचा  राजीनामा देत. गोपीनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगळी चूल मांडण्याचा इशाराच दिला

गोपिनाथ गडावरुन  पंकजा मुंडेंनी केलेल्या  भाषणाचा पुर्ण रोख हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होता.

विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे भाजपात नाराज असल्याची जोरदार चर्चा होतीं. याची ठिणगी पडली होती ती पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनं. त्यानंतर भाजपकडून पंकजा मुंडेंच्या मनधरणीचे प्रयत्नही झाले. मात्र पंकजा मुंडेंनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. पंकजा मुंडेंनी बंड केलं नसलं तरी भाजपच्या कोअर कमिटीचा  राजीनामा देत वेगळी चूल मांडण्याचा इशाराच पक्षनेतृत्वाला दिल्याचं बोललं जातंय.

Web Title - marathi news panakaja munde takes new disision on 

संबंधित बातम्या

Saam TV Live