पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; 63 गावांचा संपर्क देखील तुटला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जुलै 2018

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररुप धारण केलंय. गेल्या सहा दिवसांपासून पडणाऱ्या कोसळधारा मुळे जिल्ह्यात पाणीच-पाणी झाले आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून ती पात्राबाहेर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 63 गावांचा संपर्क देखील तुटला आहे. पावसामुळे पाच राज्यमार्ग आणि 13 जिल्हामार्गावरी वाहतूक अंशत: बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल 62 बंधारे पाण्याखाली गेले.

राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

WebTitle -marathi news panchaganga river overflow 

संबंधित बातम्या

Saam TV Live