विठूरायाला साकडे घालण्यासाठी सुमारे दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात 

विठूरायाला साकडे घालण्यासाठी सुमारे दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात 

पंढरपूर - "चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान'' अशा भावनेने आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होऊन विठूरायाला साकडे घालण्यासाठी सुमारे दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. राजस सुकुमाराचे दर्शन घेऊन तृप्त होण्यासाठी आलेल्या या वारकऱ्यांमुळे पंढरीत जणू भक्तीचा महापूर आला. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज (रविवारी) 19 तास लागत होते. दर्शनाची रांग गोपाळपूरपासून पुढे रांझणी रस्त्यावर गेली होती. 

सावळ्या विठूरायाला भेटण्यासाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात आणि मध्यप्रदेशातूनही त्याचा सारा गोतावळा येथे जमा झाला आहे. "टाळ, मृदंग आणि वीणेचा मंगलध्वनी, सुरेल आवाजातील अभंग आणि मोठ्या श्रद्धेने सुरू असलेला "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'असा जयघोष सर्वत्र ऐकू येत असून, सारे वारकरी आषाढी यात्रेच्या सोहळ्यात देहभान हरपून तल्लीन झाले आहेत. जिकडे पहावे तिकडे कपाळी टिळा, हाती भगवी पताका अन्‌ मुखी हरिनामाचा जयघोष करणारे वारकरी दिसत आहेत. अवघी पंढरी भक्तीरसात चिंब झाली आहे. टाळ मृदंगाचा ठेका वारकऱ्यांच्या कानामनात भरला आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांसह श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत मुक्ताबाई, श्री संत गजानन महाराज आदी शेकडो पालख्या मोठ्या उत्साहात येथे दाखल झालेल्या आहेत. 

मुखदर्शनासही विक्रमी गर्दी 
पदस्पर्श दर्शनासाठी जास्त वेळ थांबावे लागते, म्हणून मुखदर्शन घेण्याकडे देखील भाविकांचा कल वाढल्याचे दिसत आहे. आज मुखदर्शनाची रांग मंदिराच्या बाजूने फिरून काळा मारुती मार्गे चौफाळ्यातून पुन्हा पश्‍चिमद्वारच्या रस्त्याकडे गेली होती. 

WebTitle :: marathi news pandharpur chandrabhaga river ashadhi ekadashi wari 2018

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com