पांडुरंगाच्या पंढरपुराला पुराचा धोका; 700 कुटुंबांचं स्थलांतर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुसळधार पाऊस आणि त्यामुळं भीमेनं गाठलेल्या धोक्याच्या पातळीमुळं पंढरपुरात हाहाकार माजवलाय. नदीकाठच्या व्यासनारायण, अंबाबाई पटांगण, लखुबाई नगर या भागात पुराचं पाणी शिरलंय. प्रशासनानं आता पर्यंत शहरातील सुमारे 700 कुटुंबांचे सुरक्षीतस्थळी स्थलांतर केलंय.

पूरग्रस्त लोकांना विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं तांदुळ, तूर डाळ, तेल, गहू, गॅस यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचं वाटप करण्यात येतंय. तब्बल ६ वर्षांनंतर पंढपुरात पुराची स्थिती निर्माण झालीय. वीर आणि उजनी धरणातून सुमारे 2 लाख 20 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 

पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे, सोबतच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live