हापूसच्या नावाखाली होतेय ग्राहकांची फसवणूक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मे 2019

पंढरपूर : अक्षय तृतीयेला आंब्याला अन्यन्य साधारण महत्त्व असते. याच दिवशी आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. हिच नामी संधी ओळखून पंढरीतील विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची अव्वाच्यासव्वा दराने विक्री सुरु केली आहे. त्यातच आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड या विषारी पावडरचा वापर केला जात असल्याने आंबे खवय्यांच्या आरोग्याचाही प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

पंढरपूर : अक्षय तृतीयेला आंब्याला अन्यन्य साधारण महत्त्व असते. याच दिवशी आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. हिच नामी संधी ओळखून पंढरीतील विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची अव्वाच्यासव्वा दराने विक्री सुरु केली आहे. त्यातच आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड या विषारी पावडरचा वापर केला जात असल्याने आंबे खवय्यांच्या आरोग्याचाही प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी येतात. अक्षय तृतीच्या काळात तर हापूसासच्या नावाखाली येथील विक्रेत व व्यापारी हात साफ करुन घेतात. अशातच बाहेरील काही आंबे विक्रेते शहरात येऊन शहर व तालुक्यातील लोकांची शुध्द फसवणूक करतात.

उद्या (ता.7) अक्षय तृतीया आहे. आज येथील आंबे बाजारात फेरफटका मारल्यानंतर हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची सरासपणे विक्री केली जात असल्याची धक्कदाय बाब समोर आली आहे. बाजारात केशर, लालबाग, तोतापुरी आदींसह कर्नाटकातील काही गावराण जातीचे आंबे बाजारात  मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत. याबरोबरच देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबे मिळतील अशा पाट्या ही शहरातील विक्रेत्यांकडे झळकू लागल्या आहेत.

त्यामुळे बहुतांश ग्राहकांची यामध्ये मोठी फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी कर्नाटकच्या आंब्याची हापूस म्हणून 400 ते 500 रुपये डझन दराने विक्री केला जात आहे. तर लाल बाग जातीच्या आंब्याची 100 रुपये किलो दराने विक्री सुरु आहे. ग्रामीण भागात केशर आंब्याची लागवड वाढल्याने यावर्षी केशर आंब्याची  आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. रंग,चव आणि आकाराने मोठा असल्याने  सर्वसामान्य ग्राहकांकडून केशर आंब्याला मागणी आहे. 80 ते 100 रुपये दराने केशरची विक्री सुरु आहे.  हापूसच्या नावाखाली इतर जातीच्या आंब्यांची विक्री केली जात असल्याने व्यापार्यांच्या या गोरख धंद्याविषयी नागरिकामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर
शहरातील बहुतांश व्यापारी कर्नाटकातून कच्ये आंबे मागवतात. येथे आल्यानंतर गोडाऊनमध्ये ठेवले जातात. आंबे लवकर पिकावेत यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जात असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आंबे पिकवण्यासाठी आरोग्यास घातक असलेल्या  रासायनिक पाव़डरचा वापर होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने या काळात आंबे विक्रेत्यांच्या गोडाऊनची तपासणी करुन केमिकल पावडरचा वापर कऱणार्या व्यापार्यांवर कारवाई करावी अशी मागणी  सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

आंबे पिकवण्यासाठी आरोग्याला घातक ठरणाऱ्या रासायनिक पावडरचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर येथील व्यापार्यांची बैठक घेवून त्यांना सूचना दिल्या आहेत. आजूनही कुठे कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जात असेल तर ते धोकादायक आहे. व्यापाऱ्यांनी कुठल्याही रासायनिक पावडरचा वापर करु नये.केल्यास कडक कारवाई केली जाईल.
- पी. एम. राऊत, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर

Web Title: Karnataka mangoes sale in Pandharpur


संबंधित बातम्या

Saam TV Live