विठुरायाच्या पंढरीत चप्पलीला सोन्याचा भाव...

भारत नागणे
शनिवार, 14 डिसेंबर 2019

धिप्पाड शरिरयष्ठी, बहारदार व्यक्तीमत्व आणि झुपकेदार मिशा. हे आहेत पंढरपुरातले चांगदेव दावणे. पंढरपुरात सध्या त्यांच्याच नावाची हवा सुरुय. यामागे कारण आहे त्यांची ही नागीण चप्पल. मंडळी ही साधीसुधी चप्पल नाही. तिची बांधणी राजस्थानी थाटात करण्यात आलीय. या चपलेला सात नागफण्या आहेत म्हणून तिचं नाव नागीण चप्पल.चालताना चपलेतून आवाज यावा म्हणून दावणेंनी 100 घुंगरू देखील लावलेत. तर रात्री चप्पल उठून दिसावी म्हणून बॅटरीच्या सहाय्याने दिवे देखील लावण्यात आलेत. या चपलेचं वजन आहे 6 किलो आणि या सर्वांसाठी खर्च आलाय 25 हजार रुपये.

मंडळी इतक्या महागामोलाची चप्पल घालणारी व्यक्ती म्हणजे एखादी राजा महाराजाच असावी, पण दावणेंचं तसं अजिबात नाही. शिपाई पदावर असलेल्या दावणेंनी केवळ हौसेखातर हा सारा खटाटोप केलाय. 

Web Title : A Man In Pandharpur Wearing 25 Thousand sandals

संबंधित बातम्या

Saam TV Live