पंढरपूरात स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला दूध पिशव्यांची वाहतूक करणारा टेम्पो

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

दूध दरवाढीच्या आंदोलनाचे पडसाद चौथ्या दिवशीही पाहायला मिळाले. पंढरपूर येथील केबीपी कॉलेजसमोर दूध पिशव्यांची वाहतूक करणारा टेम्पो स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला आणि अन् दुधाच्या पिशव्याही रस्त्यावर फेकल्यात. दूधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी खासदार राजू शेट्टींनी पंढरपुरातूनच  सरकार विरोधी एल्गार पुकारला होता.

दरम्यान, पुणे शहराला होणारा दूध पुरवठा पूर्णपणे विस्कळित झालाय. पुण्यात सर्वाधिक दूध वितरित होणाऱ्या चितळे डेअरीकडून आज, दूध विक्री होणार नसल्याचे वितरकांनी स्पष्ट केले आहे. चितळे डेअरीकडून दररोज पुण्याला तब्बल साडे चार लाख लिटर दूधाचा पुरवठा होतो. मात्र चितळेंचं दूध वितरण पूर्णपणे ठप्प झाल्याने, पुणेकरांना आज कोराच चहा प्यावा लागणार आहे.

WebTitle : marathi news pandharpur milk agitation day four  

संबंधित बातम्या

Saam TV Live