'मलाच सारखं आमच्या पक्षात या असं बोलावण येत' - भारत भालके यांचा धक्कादायक खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 जुलै 2019

पंढरपूर : मी कोणाच्याही मागे लागलेलो नाही, मलाच सारखं आमच्या पक्षात या असं बोलावण येत आहे, असा खुलासा आमदार भारत भालके यांनी केला आहे. जनताच माझा पक्ष ठरवेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार भारत भालके यांनी रविवारी (ता.29) शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आपल्या निवास स्थानी बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या या खुलाशामुळे भाजप -सेना नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

भाजप सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना व साखर कारखानदारांना ईडीची आणि आयकर खात्याच्या चौकशीची भिती दाखवून पक्षांतर करण्यास भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप शदर पवार यांनी केला आहे. त्यानंतर आमदार भालकेंनी आपल्याला भाजप सेनेनेकडून पक्षांतरासाठी फोन येत असल्याचा खुलासा केल्याने राष्ट्रवादीच्या नेते शरद पवारांनी केलेल्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे.

मी अजून कोणाकडेही मला पक्षात घ्या म्हणून गेलेलो नाही, उलट मलाच पक्षात या म्हणून फोन येतायत. परंतु माझा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांकडे आणि जनतेच्या दरबरात ठेवला आहे. त्यांनीच निर्णय घ्यावा असेही यावेळी भालके यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pandharpur MLA Bharat Bhalke statement on enters in BJP

संबंधित बातम्या

Saam TV Live