महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आघाडीबाबत कोणतीही चर्चा नाही : जयंत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 जानेवारी 2019

पंढरपूर : लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी आठ ते दहा दिवसांत जाहीर केली जाईल. आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आघाडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (बुधवार) दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा आज पंढरपूर तालुक्यातील  भोसे गावात आली होती. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अण्णा हजारे यांच्या उपोषणास आमचा पाठिंबा नाही. त्यांच्या मागण्या होत्या त्याचा आमच्या सरकारच्या काळात कायदा केला. पण भाजपने त्यांच्या काळात याची अंमलबजावणी केली नाही.  आपल्या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येईल, याची भीती त्यांना आहे, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. 

दरम्यान, आता पुन्हा अण्णा हजारे उपोषणास बसणार याची भाजपला भीती आहे. म्हणूनच आता त्यानी माजी मुख्यमंत्र्यांना चौकशीच्या कक्षेत आणले आहे. पण मुख्यमंत्र्यानी स्वतःला चौकशी कक्षेत आणण्याची तयारी दाखवायला हवी होती, असेही यंत पाटील म्हणाले.

Web Title: There is no discussion about Maharashtra Navnirman Sena's alliance: Jayant Patil

संबंधित बातम्या

Saam TV Live