विठूरायाला हापूस आंब्यांची आरास

विठूरायाला हापूस आंब्यांची आरास

पंढरपूर : विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या विठुरायाचा गाभारा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजवला जातो. सध्या आंब्याचा सीझन सुरु असल्याने आज पुणे येथील आंब्याचे व्यापारी विलास काची यांनी तब्बल अकरा हजार हापूस आंब्याचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा आकर्षक पद्धतीने सजवला आहे.

ज्येष्ठ मंडळींच्या माहितीनुसार, अशा पद्धतीने विठुरायाच्या आणि श्री रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात हापूस आंब्यांची आरास आज प्रथमच करण्यात आली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले आणि व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांनी गेल्या वर्षभरात विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने आकर्षक आणि रंगीबेरंगी फुलांनी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यात सजावट करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली होती.

Web Title: Pandharpur Vithhal Temple decorated with Mangoes

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com