भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय 67) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदय विकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन तपासणी केली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण, सोमय्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली होती.

बुलडाणा, खामगाव परिसरात भाजपला वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकऱ्यांशी भाजपला जोडण्याचे काम फुंडकर करत होते. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने होत असताना फुंडकर यांनी योग्य पद्धतीने ती हाताळली. सामान्या नागरिकांशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती. 

भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते म्हणून फुंडकर यांची ओळख होती. भाजपच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होती.
- रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष 

माझा त्यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसला नाही. भाजपला महाराष्ट्रात उभारी देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची नीट जाण त्यांना होती. 
- चंद्रकांत पाटील, भाजप नेते

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com