गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. त्यांना भेटून आलेले माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनीही मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थीर असल्याचीच माहिती दिली आहे.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. त्यांना भेटून आलेले माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनीही मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थीर असल्याचीच माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तररात्री अडीच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा रक्तदाब कमालीचा कमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनल्याची माहिती प्रसारीत झाली होती. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी अनेकांनी उत्तर रात्री तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी धाव घेतली होती. मात्र त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी मिळालेली नव्हती. त्यापैकी काहीजण मुख्यमंत्र्यांच्या मुलाला भेटून घरी परतले होते.

सकाळी ही माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना समजताच त्यांनी मुख्यमंत्र्यांची सदनिका असलेल्या इमारतीखाली डेरा टाकला होता. मात्र कोणीही अधिकृतपणे माहिती देत नव्हता. त्यामुळे प्रकृतीविषयीच्या अफवा जन्माला येण्यास सुरवात झाली होती. अखेरीस सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून ट्विटरच्या माध्यमातून प्रकृती स्थीर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर कुंकळकर यांनीही तशीच माहिती दिली.

पर्रीकर हे स्वादुपिंड्याच्या आजाराने गेले वर्षभर आजारी आहेत. अमेरीकेत, मुंबईत आणि दिल्लीतही त्यांच्यावर उपचार कऱण्यात आले आहेत. गेले चार महिने ते घरीच उपचार घेत आहेत. मध्यंतरी त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याने त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला होता त्यावेळीही त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती प्रसारीत झाली होती.

Web Title: Goa CM Manohar Parrikar is stable now confirms MLA Sidharth Kuncalienker


संबंधित बातम्या

Saam TV Live