नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप यशस्वी होणार?

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

मुंबई : आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आलीय. भाजपची ही महत्वाची बैठक असणार आहे. मात्र या बैठकीत एक महत्वाच्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ते म्हणजे या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहण्याची शक्यताय. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीत खडसेंच्या दिल्लीवारी संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. सत्ता गेल्यापासून भाजपाचे उलटे वारे वाहायला सुरुवात झालीय. आणि त्यातच भाजपातील नाराजांनी डोकं वर काढलंय. हे नाराज नेते आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

दरम्यान पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे दोघं नावाजलेले आणि महत्वाचे नेते आहेत त्यामुळे त्यांची नाराजी भाजप मिटवण्यास सध्या तरी असमर्थ दिसतेय.

नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे भाजप खडसेंवर नेमकी काय भूमिका घेतंय याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय तर दुसरीकडं पंकजा मुंडे औरंगाबादमध्ये झालेल्या विभागीय बैठकीला गैरहजर राहल्या होत्या त्यामुळे आज होणाऱ्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडे हजर राहणार का याकडंही लक्ष लागलंय. दरम्यान येत्या 12 डिसेंबरला पंकजा काय घोषणा करणार याचीही सर्वांना उत्सुकता लागलीये.

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Pankaja Munde to attend BJP meeting today?

संबंधित बातम्या

Saam TV Live