जीव देऊ नका तुम्ही आमचा जीव घ्या; पंकजा मुंडेंचे भावनिक अवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

आरक्षणासाठी तुम्ही जीव देऊ नका तर तुम्ही आमचा जीव घ्या असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाची फाईल जर माझ्या टेबलावर असती तर एका क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. परंतु ही फाईल न्यायालयात प्रविष्ठ असल्याने आपण काहीच करु शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांनी आज परळीमध्ये ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवाना भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांपर्यंत जाणार आहे. मी तुमची दुत बननार. मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशन घेण्यास सांगणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याआधी, मुंडेसाहेबांनीसुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. 

आंदोलनात चुक नसताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विनवणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, मेगा भरती दरम्यान, अनेक मराठा युवकांना नोकरी मिळणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live