शिवरायांची शपथ; फाईल माझ्याकडं असती तर क्षणाचाही विलंब न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं असतं - पंकजा मुंडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

शिवरायांची शपथ...मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडं असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिलं असतं, असं सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय.  

शिवरायांची शपथ...मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडं असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिलं असतं, असं सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय.  

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या काही भागात आजही आंदोलन सुरूच आहे. बीडमधील परळी इथं मराठा बांधवांनी आज ठिय्या आंदोलन केलं. पंकजा मुंडे यांनी तिथं जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना पंकजा यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला ठाम पाठिंबा दर्शवला. आरक्षणाच्या प्रश्नावर मी मराठा समाजाच्या सोबत आहे. मी मराठा बांधवांची दूत बनणार आहे. आरक्षण मिळावं यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live