(video)सावरगावातून पंकजा मुंडेंची ललकारी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाची लढाई सुरू झालीय. भगवानगडावर नामदेवशास्त्रींनी भाषण नाकारल्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवानगडाचं राजकीय महत्त्वच कमी करायला घेतलंय. गेल्या वर्षापासून त्यांनी भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगावात मेळावा घेण्यास सुरूवात केलीय.

याच मेळाव्यातून त्या आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकण्य़ाची शक्यता आहे.
खासदार प्रीतम मुंडेंनी सावरगावातल्या मेळाव्याच्या ठिकाणाची पाहणी केली. मेळावा राजकीय नाही असं त्या सांगत असल्या तरी पाठिराख्यांना मेळाव्यातून काय मिळेल हे त्यांनी सांगितलं.

बीडमध्ये धनंजय मुंडेंचं आव्हान आहे. भाजपमध्येही पंकजा मुंडेंचे अनेक प्रतिस्पर्धी आहेतच. या सगळ्यांना पुरून उरण्यासाठी पंकजा मुंडेंना सावरगावचा मेळावा ऑक्सिजन ठरणार आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live