बीडची गृहमंत्री मीच - पंकजा मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले. पण, आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेकांना त्यांनी घडवले, दुःखावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या काही जण एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नाव मात्र दुसऱ्याचे घेतात असा दुटप्पी पणा फार काळ चालणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

"माझे नुकसान करताना इतरांच्या दहा चुली बंद करण्याचे पाप करू नका, समोरुन वार करा, हारले तर सन्मानाने हार स्विकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल," असा घाणाघातही त्यांनी केला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्हा तीनही मुलींवर चांगले संस्कार केले, खंबीरपणे वाढवले, त्यांनी आम्हाला हिंमत तर दिलीच पण त्याचबरोबर दयाळूपणाही शिकवला. गोपीनाथ गडावर बोललेला शब्द खरा ठरतो त्यामुळे देशात पुन्हा 'कमळ'च फुलणार आहे, "असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

याप्रसंगी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर, खासदार डॉ. प्रितम मुंडे, दादा इदाते, आमदार आर. टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, आमदार सुरेश धस, आमदार सुधाकर भालेराव, आमदार मोहन फड, आमदार मोनिका राजळे, आमदार पवार, गोविंदराव केंद्रे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live