राज्याच्या राजकारणात किंगमेकरच राहणार... पंकजा मुंडेंची सावरगावातून ललकारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

सावरगावच्या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनींनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. संत भगवानाबाबांच्या जन्मगावातल्या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येनं गर्दी झाली होती. भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही पंकजा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडेंनी समाजबांधवांना भावनिक आवाहन केलं. 

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर भगवान गडावर मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेऊ नये, तिथं राजकीय भाषण करू नये अशी बंधनं भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घातली. त्यामुळं 3 वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याशीच पंकजांना मेळावा घ्यावा लागला होता. त्यानंतर सावरगाव इथल्या ग्रामस्थांच्या आग्रहास्तव मागच्या वर्षीपासून भगवानबाबांचं जन्मस्थळ असलेल्या सावरगावात दसरा मेळाव्याला सुरुवात झाली.

पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यातून अनेकांवर तोफ डागली.
या दसरा मेऴाव्याच्या यशासाठी पंकजा मुंडे समर्थकांनी कंबर कसली होती. पंकजा मुंडेंनी साद घातली आणि त्यांच्या एका हाकेवर लाखो समर्थक सावरगावात दाखल झाले. हा दसरा मेळावा म्हणजे संत भगवानबाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर असलेल्या समाजबांधवांच्या भक्तीचा मेळा ठरला. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live