पेपर बॉम्ब; सध्याच्या घडीला बाजारातील खतरनाक ड्रग्स

विकास काटे, साम टीव्ही
बुधवार, 12 जून 2019

काय आहे पेपर बॉम्ब?

- पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर
- ड्रग्ज मार्केटमध्ये सर्वात आधुनिक आणि महागडं ड्रग्स
- पेपर बॉम्ब साठी अनेक कोडवर्ड्स
- पिंक सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन, आय - 25

पेपर बॉम्ब ड्रग... सध्याच्या घडीला बाजारात असलेलं अत्यंत धोकादायक आणि खतरनाक ड्रग्स... नावातूनच हा पेपर बॉम्ब किती विनाशकारी असेल याची कल्पना तुम्हाला आली असेल... कोकेन, पापी स्ट्रॉ, हेरॉईन, व्हाईटनर अशा कितीतरी गोष्टींनी आजची तरुणपिढी नशा करतेय. आणि दरदिवशी बाजारात वेगवेगळ्या ड्रग्सची भर पडतेय. आता यात सगळ्यात भयानक अशा पेपर बॉम्ब ड्रग्सची भर पडलीय... 

काय आहे पेपर बॉम्ब?

- पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर
- ड्रग्ज मार्केटमध्ये सर्वात आधुनिक आणि महागडं ड्रग्स
- पेपर बॉम्ब साठी अनेक कोडवर्ड्स.
- पिंक सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन, आय - 25
- हे ड्रग्ज पावडर, टॅबलेट आणि लिक्वीड अशा तिन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
- तरुणाईकडून पेपर प्रकाराला जास्त मागणी.
- पेपरचा तुकडा जिभेवर ठेवताच तो हळूहळू विरघळतो आणि नशा होते.
- सुपरहिरो असल्याचा भास होतो.
- नशा करणाऱ्या व्यक्तीला आकाशात उंच भरारी घेत असल्याचा भास.

'पेपर बॉम्ब' हे कागदासारखं दिसणारं, पण अत्यंत घातक असं ड्रग्ज ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकानं पकडलंय.  एक ते दीड लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हितेश मल्होत्रा या पेडलरकडून जप्त केलेत. 

पेपर बॉम्बनं ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युरोपमध्ये धुमाकूळ घातलाय. परदेशात या ड्रग्जवर कडक निर्बंध असल्यानं त्यानं आता भारतात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. भारतातही पेपर ड्रग्जवर कठोर निर्बंध आणणं गरजेचं आहे, नाहीतर अख्खी तरुण पिढी बरबाद होऊ शकते.

WebTitle : marathi news paper bomb drug most dangerous drug caught by thane police 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live