परळी शहरावर पिण्याच्या पण्याचं संकट गंभीर..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 एप्रिल 2019

परळी वैजनाथ - परळी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्‍यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पाने तळ गाठला असून दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरावर पिण्याचे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या प्रकल्पातील परळीकरांच्या पिण्यासाठी राखीव ठेवलेले पाणी गेले कुठे, असा सवाल येथे नागरिक उपस्थित करीत आहेत.

सुमारे १९ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या वाण नदीवर बांधण्यात आलेला वाण प्रकल्प एकदा भरला, की परळीकरांच्या पिण्याच्या पाण्याची दोन वर्षे चिंता दूर होते. सरलेल्या पावसाळ्यात वाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाल्याने हा प्रकल्प यंदा भरला नव्हता. प्रकल्प जरी भरला नसला तरी प्रकल्पात पावसाळा सरत आला तेव्हा सुमारे १५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. गेल्या सहा महिन्यांत या प्रकल्पातील पाण्याचा शेती, उद्योगासाठी वापर झाला असला तरी परळीकरांसाठी प्रकल्पातील पाणी आरक्षित केले होते. 

पाणी आरक्षित केलेले असतानाही या प्रकल्पातील पाणी कुठे गेले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकल्पातून परळी शहराला सध्या आठ ते दहा दिवसाला एकवेळा पाणीपुरवठा होतो. आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने परळीकरांत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईसाठी परळी पालिकेचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दरम्यान, शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेमार्फत सुमारे २८ टॅंकरमार्फत पाणीपुरवठा केला जात असला तरी मागणी मोठी व टॅंकर कमी यामुळे नागरिकांची ओरड सुरू आहे.

Web Title: marathi news parali vaijanath drinking water shortage problem

संबंधित बातम्या

Saam TV Live