कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत परभणी जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 मार्च 2020

परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दुसरी यादी शनिवारी (ता. २९) जाहीर झाली आहे. या यादीमध्ये परभणी जिल्ह्यातील २१ बॅंकांच्या शेतकरी खातेदारांच्या १ लाख २७ हजार ९३२ कर्जखात्यांचा समावेश आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील मिळून एकूण १ लाख २८ हजार ४६७ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. आजवरच्या यादीत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांची नावे पुढील यादीत येतील. विशिष्ट क्रमांक मिळालेल्या शेतकऱ्यांनी सामुदायिक सेवा केंद्रांवर जाऊन आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २१ बॅंकांच्या शेतकरी सभासदांच्या १ लाख ९५ हजार ५७ कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी निकषानुसार ५३५ कर्ज खाती अपात्र ठरली आहेत. एकूण ६ कर्ज खात्यांबाबत तक्रारी आहेत. पहिल्या यादीमध्ये पिंगळी (ता. परभणी) आणि गिरगाव (ता. सेलू) या गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या दोन गावांतील एकूण ५३५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून, त्यांच्या खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा केली जात आहे. शनिवारी (ता. २९) जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये जिल्ह्यातील विविध बॅंकांच्या १ लाख २७ हजार ९३२ कर्ज खात्यांचा समावेश असून, त्यांना विशिष्ट क्रमांक मिळाला आहे.

web title : marathi news parbhani district's 1.25 lakh people in the second list of debt waivers

संबंधित बातम्या

Saam TV Live