परभणीतल्या शाळेत 3 चिमुकल्यांना अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत समोर आलीय. परभणीच्या श्री गणेश वेदपाठशाळेत वेदशास्त्रसंपन्न होण्यास शिकणाऱ्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडालीय.

या प्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि इतर दोघांविरुद्ध परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलकर्णी यांना अटक करण्यात आलीय. तक्रार करण्यास गेलेल्या दोन मुलांनी जेव्हा त्यांच्यावर काय अत्याचार झाले याबाबत सांगायला सुरूवात केली तेव्हा त्यांचा जाब घेणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील चक्रावून गेले.

ज्याचा प्रचंड लैंगिक छळ झाला असा तिसरा मुलगा त्याच्या गावी इस्पितळात उपचार घेत असून, त्याच्या जखमांवर डॉक्टरांना कितीतरी टाके घालावे लागले आहेत. या मुलांवर  घृणास्पदरीत्या छळ झाल्याचं समोर आलंय... गेल्या महिन्यापासून या मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू होते.

अत्याचार करणारे दोघेही त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. मुलांना नग्न करून उलटे टांगणे, पाइपने जबर मारहाण करणे, गुप्तांगास दोरी बांधून ओढणे असे घृणास्पद प्रकार केले गेले. या प्रकाराकडे संस्थाचालक कुलकर्णी यांनी डोळेझाक केल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live