पंकजा मुंडेंसाठी 'हा' आमदार राजीनामा देण्यास तयार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

परभणी :  परळी मतदार संघातून पराभव स्विकारावा लागलेल्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे  यांच्यासाठी आता गंगाखेड मतदार संघातील रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे देखील त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास तयार झाले आहेत. 

गंगाखेड मतदार संघातून पंकजा यांनी निवडणुक लढवावी त्या मताधिक्यांनी निवडून येतील असे आमदार गुट्टे यांच्यावतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावाई राजेभाऊ फड यांच्यावतीने हे पत्रक काढण्यात आले आहे.

या पत्रकात म्हंटले आहे की, राज्यातील जनतेसाठी संघर्षातून त्यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांचा पराभव माझ्यासाठी अंत्यत दुर्देवी घटना आहे. पंकजा मुंडे व महादेव जाणकर हे माझे आधारस्तंभ आहेत.

Image result for mahadev jankar facebook

पंकजा मुंडे साठी आपण गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असून पंकजा निश्चितच या मतदार संघातून मताधिक्यांनी विजयी होतील असा मला विश्वास असल्याचे त्यांनी व्यक्त केला आहे.

 पंकजा यांच्या पराभवाने आपण व्यथीत झालो असून समर्थकांनी माझ्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करू नये असे त्यांनी या
पत्रकाच्या माध्यमातून आवाहन केले आहे.  

Web Title : MLA Ratnakar Gutte Ready To Resign For Pankaja Munde 

संबंधित बातम्या

Saam TV Live