निर्दयी! पोटचा गोळाच उठला आईवडिलांच्या जीवावर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 मार्च 2020

पिंपरी : घराचा ताबा घेण्यासाठी आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री पिंपळे गुरव येथे ही घटना घडली.

जी. व्हर्गीस केजी जॉर्ज (वय 70, रा. गांगार्डेनगर, पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जॉर्ज वर्गीस, जेनी जॉय, लिना व्होरा, स्मिता सावरकर (रा. सर्व शिवाजीनगर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

जी. वर्गीस यांच्या घरी रात्री हे चौघे आले. त्या वेळी वर्गीस आणि त्यांच्या पत्नी घरात होत्या. या चौघांनी त्यांना घराचा ताबा घेण्यासाठी धमकावले व मारहाण केली.

Web Title: marathi news parents beaten up by own son for property

संबंधित बातम्या

Saam TV Live