आई-वडिलांचे हाल करणारी अशी मुलं हवीतच कशाला? वाचा, मुलांनी पालकांची काय अवस्था केलीय़?

साम टीव्ही
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020
  • औरंगाबादच्या रस्त्यांवर 200 वृद्ध माता-पित्यांचा संसार 
  • ज्यांना जीव लावला 'त्या' पोटच्या लेकरांनीच रस्त्यावर आणलं 
  • असली मुलं हवीतच कशाला?

तळहातावरच्या फोडासारखं आईवडील आपल्या मुलांना जपतात, त्यांना वाढवतात..फार नाही पण किमान या मुलांनी आपल्या म्हातारपणाची काठी व्हावं एवढीच काय ती अपेक्षा. पण आता आम्ही तुम्हाला औरंगाबादमधलं एक असं दृश्य दाखवणार आहोत जे पाहिल्यानंतर तुमचेही डोळे पाणावतील.

 

औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल परिसरात आपल्या आयुष्यातले शेवटचे दिवस काढणाऱ्या या आजीला पाहिल्यानंतर डोळ्यात टचकन पाणी येतं. या आजीला तिच्याच मुलानं उपाचारासाठी आणलं होतं.. उपचार झाल्यानंतर आपला लेक आपल्याला घरी घेऊन जाईल असं वाटलं होतं. पण तिचा मुलगा परत आलाच नाही. आता जुन्या आठवणींचा धांडोळा घेऊन या आजीबाई उरले सुरले दिवस काढतायेत...कुणी आणून दिलं तर खायचं नाहीतर पडून राहायचं.

ब्रिटनमधला नवा कोरोना महाराष्ट्रात धडकला...त्या 369 जणांचा शोध सुरु

. आतातर चालताही येईना..जगण्याची आशा केव्हाच मावळलीय....डोळ्यांसमोर उरलाय तो फक्त अंधार....हे झालं एक प्रतिनिधीक उदाहरण...असे अनेक म्हातारे आई-वडील औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात जीवन जगतायेत...हे हॉस्पिटलच जणून त्याचं घर आणि कुटुंब बनलंय. त्यांच्यावर ही वेळ आणलीय त्यांच्याच पोटच्या मुलांनी...ज्यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं, जीव लावला...त्या पोरांनी आपल्या आई-वडिलांचे असे पांग

काही स्वयंसेवी संस्थांनी आणि घाटी रूग्णालयाच्या प्रशासनानं यातल्या अनेकांना रात्र निवारा केंद्रात पाठवलं. मात्र मुलाबाळांनी सोडलेल्या पालकांची संख्या दिवसागणिक वाढतीय. त्यामुळे घाटीचं प्रशासनही हतबल झालंय. 

गेल्या वर्षभरात असे दोनशेहून अधिक वृद्ध माता-पिता वास्तव्याला आहेत. कुणाला मुलांनीच इथं सोडून दिलंय. तर कुणाच्या जवळची व्यक्ती गेल्यानं इथं राहण्याची वेळ आलीय. खरं तर  म्हातारपणाची काठी म्हणून आई-वडिल मुलांकडे पाहतात...पण स्वत:च्या सुखात मश्गूल झालेल्या या मुलांना मायेचं नातं काय कळणार? ज्या आईनं उपाशी राहून लेकरांच्या पोटाची खळगी भरली ज्या बापानं मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या...तीच मुलं आई-वडिलांना रस्त्यावर आणत असली तर एकच प्रश्न पडतो...एकवेळ निपुत्रिक राहिलं तरी चालेल पण असली मुलं जन्माला न आलेलीच बरी...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live