पोपटाला पिंजऱ्यात ठेवणारेच पिंजऱ्यात जाणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

घरात पोपट पाळण्याची हौस महागात पडू शकते. पोपट पाळण्यावर कायद्यानं बंदी आहे. त्यामुळे पोपट पाळल्यास 25 हजार रुपयांचं दंड तसंच 3 महिन्यांपर्यंत तुरुंगाची हवा खावी लागेल. त्यामुळे पाळीव पोपट आठवडाभरात वन विभागाकडे सूपुर्त करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मुंबई परिसरात नाशिक आणि मालेगावमधून  पोपट विक्रीसाठी आणण्यात येत असल्याचं  उघड झालंय. मुंबईच्या मालाडमध्येही पोपट विक्री होत असल्याच्या माहितीतून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

टिटवाळ्यातही  भविष्य सांगणाऱ्या पोपटांचा काळाबाजार  भरला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live