Parth Pawar यांच्यासाठी साठी आत्या Supriya Sule यांचा पुढाकार; हात धरून दिले धडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचे निवडणूक अर्ज भरण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गर्दी जमवत `माहोल` तयार केला.

या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनीही आपली आत्या असलेल्या सुप्रिया सुळेंच्या अर्ज भरण्याच्या वेळच्या सभेला पहिल्यांदाच उपस्थिती लावली.

पार्थ यांनी गेल्या दोन महिन्यांत अनेक सभांना उपस्थिती लावली. त्यांचा अर्ज अजून भरायचा आहे. मात्र सुळे यांच्यासोबतच ते सभास्थानी आले. पार्थ यांचा हात धरून सुप्रिया सुळेंनी त्यांना व्यासपीठावर नेले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी ओळख करून घेतली. सुळे यांचे कुटुंबियही या वेळी उपस्थित होते.

पुण्यातील नरपतगीर चौकातील सभेत भाषणे झाल्यानंतर दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. या सभेत भाजपवर सर्वच वक्त्यांनी टीका केली.  

संबंधित बातम्या

Saam TV Live