नक्षलवाद्यांनी उडवले भाजप नेते आणि माजी आमदाराचे घर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

पाटणा : बिहारमधील गया जिल्ह्यातील डुमरिया येथे बुधवारी रात्री नक्षलवाद्यांनी भाजप नेते आणि माजी आमदार अनुजकुमार सिंह यांचे घर स्फोटाच्या माध्यमातून उडविल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कोणतेही नुकसान झालेले नाही.

नक्षलवाद्यांनी डायनामाईटच्या साहाय्याने हा स्फोट घडविल्यानंतर तेथे संदेश लिहिलेले कागद सोडले आहेत. या कागदांवर मतदानावर बहिष्कार घाला असे लिहिले आहे. या स्फोटाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. अनुजकुमार सिंह हे गेल्या अनेक दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. बुधवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला आहे. 

या स्फोटात भाजप नेत्याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, परिसरात भितीचे वातावरण आहे. डुमरिया हे गयापासून 80 किमी दूर असून, येथे कायमच नक्षलवाद्यांचा वावर राहिलेला आहे. सुरक्षा रक्षकांसाठी हे  आव्हान असून, निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येणार आहे.

Web Title: naxals blast bjp leader house in dumariya of bihar

संबंधित बातम्या

Saam TV Live