पतंजलीची सिमकार्ड्स बाजारात; पतंजलीचं टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीनं आता टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केलाय. बिस्कीटपासून मॅगीपर्यंत अनेक खाद्यपदार्थ, किराणा मालातले पदार्थ, औषधी उत्पादनं यानंतर आता पतंजलीने आपली सिमकार्डं बाजारात आणली आहेत.

पतंजलीने यासाठी सार्वजनिक टेलिकॉम क्षेत्रातली कंपनी BSNLशी करार केलाय. हरिद्वारमध्ये या सिमकार्डचं अनावरण करण्यात आलं. या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिमकार्ड असं नाव देण्यात आलं आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात या सिमकार्डचा वापर पतंजलीचे कर्मचारी आणि अधिकारी यांना करता येणारंय. त्यानंतर हे कार्ड सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणारंय. या सिमकार्डसाठी आकर्षक प्लॅनही तयार करण्यात आलाय.

१४४ रुपयांच्या रिचार्जवर देशभर अनलिमिटेड कॉल्सबरोबरच २ जीबी डेटा देण्यात येणारंय. पतंजलीकडून आपल्या युजर्सना आरोग्य, अपघात आणि जीवन विमादेखील मिळणार आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live