मंत्री महोदयांच्या आगमनाच्या वार्तेन खडबडूबन जागं झालेल्या प्रशासनाने  थुकपट्टी कामाने बुजवले खड्डे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

पावसामुळे राज्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यांची पाहणी करण्यासाठी राज्यभर हिंडणाऱे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आज नवी मुंबईत आले.

त्यांनी सायन-पनवेल मार्गाची पाहणी करत, रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावाही केला. प्रत्यक्षात मात्र अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावरील खड्डे केवळ मंत्री येणार म्हणून अवघ्या 12 तासांपूर्वी बुजवले. अन् मंत्री महोद्यांच्या नजरेस चकचकीत रस्ता पाहायला मिळाला.

मंत्री महोदयांच्या आगमनाच्या वार्तेन खडबडूबन जागं झालेल्या प्रशासनाने तत्परता दाखवत, थुकपट्टी कामाने रस्ते बुजवले. अन् काही दिवसांसासाठी का होईना पण नागरिकांचा प्रवास सुखकर झाला. मात्र, ही तत्परता एरव्हीही दाखवावी अशा भावना नागरिकांनी व्यक्त केली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live