केरळमध्ये आढळला निपाह व्हायरसचा रुग्ण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 जून 2019

व्हायरस कसा पसरतो? | निपाह हा व्हायरस वटवाघळांपासून पसरतो. वटवाघळाने जर कोणत्या फळाचा चावा घेतलेला असल्यास आणि जर ते फळ किंवा भाजी माणसाने किंवा जनावराने खाल्ल्यास त्याला निपाहची लागण होते. या व्हायरसची लक्षणे म्हणजे तीव्र डोकेदुखी आणि ताप असते. विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यू होण्याची शक्यता ही 74.5 टक्के असते.

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. राज्यभरात 86 संशयित रुग्ण दाखल झाले असून, यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज (मंगळवार) दिली.

एर्नाकुलम येथे राहणाऱ्या 23 वर्षांचा युवकाला निपाहची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटमध्ये त्याची रक्तचाचणी दोषी आढळली आहे. राज्यातील 86 संशयित रुग्णांपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. चौघांपैकी एका रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे. एर्नाकुलम मेडिकल कॉलेजने या रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड तयार केला आहे. निपाह बाधित रुग्णाची प्रकृती गंभीर नसून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. नागरिकांबरोबरच रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निपाह विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी माध्यमांनीही पुढाकार घ्यावा तसेच सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही विभागाने म्हटले आहे. 2018 मध्येही निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला होता. शिवाय, त्यावेळी 750 हून अधिक रुग्णांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

निपाह व्हायरसमुळे केरळसह दिल्लीतही भीतीचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी सोशल सांगितले की, 'केरळमध्ये सर्व गरजेची औषधे ठेवण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आरोग्य विभाग सक्षम आहे. शिवाय, मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.'

व्हायरस कसा पसरतो?
निपाह हा व्हायरस वटवाघळांपासून पसरतो. वटवाघळाने जर कोणत्या फळाचा चावा घेतलेला असल्यास आणि जर ते फळ किंवा भाजी माणसाने किंवा जनावराने खाल्ल्यास त्याला निपाहची लागण होते. या व्हायरसची लक्षणे म्हणजे तीव्र डोकेदुखी आणि ताप असते. विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यू होण्याची शक्यता ही 74.5 टक्के असते.


संबंधित बातम्या

Saam TV Live