सनी लिओनीने केलं इंजिनिअरच्या परीक्षेत टॉप

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पटना- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने 15 ते 31 जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याची अट आहे. यासाठी जवळपास 17 हजार इच्छुकांनी अर्ज केला असून यामधील एक नाव सनी लिओनी आहे. सनी लिओनीचं नाव आल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नावात काय आहे असं म्हणतात, पण जर नाव सनी लिओनी असेल तर खूप काही आहे असंच म्हणावे लागते. बिहारमधील सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता पदासाठी आलेल्या अर्जांमध्ये सनी लिओनीने टॉप केलं आहे. सनी लिओनी नाव असणाऱ्या तरुणीने अर्ज केला आहे की, टाइमपास करण्यासाठी अर्ज भरला आहे याची खात्री अद्याप होऊ शकलेली नाही. अर्जदाराने आपल्याला 98.5 टक्के गुण मिळाल्याचा दावा केला आहे.

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे संयुक्त सचिव (व्यवस्थापन) अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सनी लिओनी नावाने एक अर्ज मिळाला आहे. वडिलांचे नाव लिओना लिओनी सांगण्यात आलं असून जन्मतारीख 13 मे 1991 आहे. तरुणीने 98.5 टक्क्यांसहित डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंग केल्याची माहिती दिली आहे. हा अर्ज खरा आहे की खोटा याची खात्री झालेली नाही. प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच हे स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Web Title: Sunny Leone Has Topped This Bihar Engineering Exam

संबंधित बातम्या

Saam TV Live