#SathChal 'पाऊले चालती पंढरीची वाट'.. वारी म्हणजे साम! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 जुलै 2018

मुंबई : 'कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद' म्हणत लाखो वारकऱ्यांनी विठूमाऊलीच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. जनसामान्यांचे दैवत असणाऱ्या लेकुरवाळ्या विठोबाच्या चरणी आषाढी एकादशीच्या दिवशी नतमस्तक होणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यांमध्ये सहभागी न होऊ शकणाऱ्या विठ्ठल भक्तांना "साम' वाहिनी घरबसल्या वारीची अनुभूती देणार आहे. 'पाऊले चालती पंढरीची वाट' ह्या खास कार्यक्रमाचे प्रक्षेपण "साम'वर गुरुवारपासून (ता.5) दररोज संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजता पुन:प्रसारित होईल. 

सोनाई पशू आहार प्रस्तुत "पाऊले चालती पंढरीची वाट' कार्यक्रम पॉवर्ड बाय फिनोलेक्‍स केबल्स असून, जैन इरिगेशन, इंदू फार्मा, प्रलाशर बायो, मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, भूमाई महालक्ष्मी फर्टिलायजर्स, राजर्षी शाहू बॅंक आणि प्लॅन्टो कृषितंत्र कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. वारीच्या परंपरा, मार्ग, पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या आदी विषयांबरोबर पालखी सोहळ्याचे खास आकर्षण असणारे ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान, उभे रिंगण, गोल रिंगण, भजन, भारुड, कीर्तनांचा आनंद "साम'च्या प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे. प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. 

Web Title - marathi news paule chalati pandharichi waat wari 2018 pandhrpur #SathChal

संबंधित बातम्या

Saam TV Live