पार्थच्या रूपाने पवार कुटुंबाचा पहिला राजकीय पराभव

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या पवार कुटुंबियाने पहिला राजकिय पराभव आज मावळ लोकसभा मतदारसंघात पाहिला. पार्थ पवार हे शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून लाखांहून अधिक मतांनी पराभूत होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामतीतून एक लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. 

पवार कुटुंबाला एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव पाहावा लागत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1967 पासून आतापर्यंत एकाही राजकीय निवडणुकीत पराभव पाहिला नाही. त्यांनी या निवडणुकीतू माढातून माघार घेतल्यानंतर ते पराभवाला घाबरले असल्याची टीका विरोधकांनी केली. पण मी 17 पैकी एकही निवडणूक हरलो नसल्याचे विरोधकांनी लक्षात ठेवावे, अशी प्रतिटिका पवार यांनी केली होती.

अजित पवार यांनीही 1991 पासून एकदाही पराभव पाहिलेला नाही. ते तर स्वतःच्या बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत स्वतः प्रचाराला जात नाहीत. तरी ते मोठ्या फरकाने निवडून येतात. सुप्रिया सुळे यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या संघर्षाने विजय मिळवला होता. 2019 मध्ये ती कसर त्यांनी भरून काढत मोठ्या मताधिक्याची तयारी केली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित हे बारामतीतून जिल्हा परिषदेवर सहज निवडून गेले होते.

या साऱ्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचा पराभव राष्ट्रवादीला खटकणारा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात आतापर्य़ंत तीन निवडणुका झाल्या. एकाही निवडणुकीत पक्षाला यश मिळू शकले नाही. अजितदादांनी आव्हान म्हणून हा मतदारसंघ स्वीकारला होता. मात्र बारणे यांनी हे आव्हान मोठ्या निर्धाराने परतवून लावले.

संबंधित बातम्या

Saam TV Live