भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

लैंगिकता हा असा विषय आहे ज्यावर अनेक वेळा मुद्दामून काहीतरी वाईट म्हणून पाहिलं जातं, ज्यावर अनेकदा खुलेपणाने बोलणं देखील टाळलं जातं. जी काही चर्चा होते ती लपून-छपून किंवा फार आढेवेढे घेत केली जाते. मात्र आता लैंगिकता या विषयावर भारतातील लोक खुलेपणाने आपलं मत मांडू लागलेत असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का ? हो, पण आता भारतीय लोकं लैंगिकता या विषयावर खुलेपणाने बोलालायला लागलेत. एका इंग्रजी वृत्तसमूहाने केल्लेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. 

भारतीय लोकं आता सेक्स आणि व्हर्जीनिटी या विषयांवर खुलेपणाने बोलू लागलेत. याचसोबत भारतातील अशी अनेक शहरं आहेत जिथं लोकं सेक्सच्या बाबतीत बरीच प्रगल्भ झाली आहेत. याचसोबत प्रथमच सेक्स अनुभवणाचं सरासरी वय देखील कमी झालंय. 

सर्वात कमी वयात आपली व्हर्जीनिटी गमावणाऱ्या शहरांमध्ये सर्वात पहिला नंबर लागतो तो गुवाहाटी शहराचा. इथल्या 61 टक्के लोकांनी त्यांच्या किशोर वयातच पहिल्यांदा सेक्सचा अनुभव घेतल्याचं स्पष्ट केलं. 

भारतातीत ज्या शहरांमध्ये हा सर्वे केला गेला त्यात गुवाहाटीचा नंबर पहिला आहे. दरम्यान, देशातील 33 टक्के लोकांनी त्यांच्या पहिल्यांदा सेक्सचा अनुभव किशोर वयात घेतल्याचं स्पष्ट केलंय. या आधी 2003 मध्ये असाच एक सर्व्हे घेण्यात आला होता. यावेळी फक्त 8 टक्के लोकांनी किशोर वयात सेक्सचा पहिला अनुभव घेतल्याचं स्पष्ट केलं होतं.   

यामागे इंटरनेट आणि मोबाईल हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. या सर्वेक्षणातून लोकं आपल्या लैंगिक आयुष्यावर अधिक खुलेपणाने बोलायातय असं देखील स्पष्ट झालंय. भारतातील 53 टक्के लोकं आपल्या पार्टनरच्या कौमार्याबद्द्ल खूप गंभीर असल्याचंही स्पष्ट झालंय.   
 
Web title : people of this city are in the forefront of the losing their virginity 

संबंधित बातम्या

Saam TV Live