राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले बंडखोर घरपवापसी करणार?

मोहिनी सोनार
सोमवार, 9 डिसेंबर 2019

सांगली : भाजपमधील नाराजीनाट्याबाबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केलाय. राष्ट्रवादीला विधानसभेआधी चांगलीच गळती लागली होती. अनेक जण सत्तेच्या मोहासाठी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले, आता मात्र सत्तेचं चित्र पूर्णपणे पलटलं आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांची चांगलीच गोची झाली. विरोधी पक्षीय बाकावरच बसण्याची वेळ या बंडखोरांवर आली. 

मागच्या काही काळात अनेक लोकांनी राष्ट्रवादीला रामराम केला, पण अलीकडे हे लोकं फोन करायला लागले असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिलीय. झाले गेले विसरुन आपण पुन्हा एकदिलाने काम करु, असंही विधान जयंत पाटलांनी केलंय.

पाहा सविस्तर-

यामुळे एका नवीन राजकीय चर्चेला वाट मिळालीय. आता भाजपात गळती होण्याची चिन्हं दिसतायत. निवडणुकीआधी महाभरती आणि सत्तास्थापनेनंतर महागळती होते की काय? अशी भीती आता भाजपला आहे. त्यातच जयंत पाटलांनी अशा प्रकारचं विधान केल्यानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीत गेलेले बंडखोर पुन्हा घरवापसी करणार आहेत हे नक्की झालंय. मात्र नेमक्या कोणाकोणाची घरवापसी होते हे पाहणं महत्वाचं असेल. 

Web Title - people who leave ncp will again return in ncp

संबंधित बातम्या

Saam TV Live