लोकांनी गांभीर्याने विचार केला नाही तर, लवकरच इटलीसारखी स्थिती होणार...पाहा हा भयंकर फोटो...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 मार्च 2020

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. याबरोबरच लोकांना घरी राहण्याचे आवाहनही केलं. मात्र, गरीब आणि कामगार वर्गासमोरच्या अडचणींमध्ये यामुळे वाढ झाल्याचे दिसून आले.

आपण साधारण परिस्थिती सध्या आहोत. मात्र इटलीपेक्षाही भयावह परिसथिती निर्माण होऊ शकते याचा प्रत्यय तुम्हाला या फोटोमधून येईल. हातावर पोट असलेले लोक जगतील कसे हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे हे लोक आपापपल्या गावी जायला गर्दी करतायत. मजुरांचे खाण्याचे प्रचंड हाल होतोयत. त्यातच प्रशासन करुन करुन किती रपणार हा ही मोठा प्रश्न आहे.

दिल्लीत लोकांची मोठी गर्दी 

दिल्लीत हातवर पोट असणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या समस्या जाणवू लागल्यानंतर सगळे कामगार गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. लॉकडाऊन असतानाही मोठ्या संख्येत लोक जमा झाल्याने प्रशासनासमोरच्या अडचणींमध्ये भर पडली. मजूर, कामगार आणि गरिबांसाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, यानंतरही राजधानी दिल्लीतील कामगार वर्ग दिल्लीत थांबण्यासाठी तयार नाही. सगळ्यांना आपल्या गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे शनिवारी (ता.२८) मोठ्या संख्येत लोक बाहेर पडले होते. आनंद विहार बसस्थानकावर हजारोंच्या संख्येत लोक जमा झाल्याने तेथे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

शहरात खाण्या-पिण्याची आबळ होत असल्याने लोक गावी जाण्याच्या मतावर ठाम आहेत. गावाकडे निदान खाण्या-पिण्याचे तरी हाल होणार नाहीत, असे या सगळ्यांचे म्हणणे आहे. वाहतूक व्यवस्था पूर्ववत केल्याने आता काय करायचं या द्विधा मनस्थितीत काहीजण अडकले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शनिवारी हजारोंच्या संख्येत लोक आनंद विहार बसस्थानकावर आले होते. 

कोरोनाची लोकांना अजिबात भीती नाही, सोशल डिस्टन्सचा विसर

घरी जाणं हे मनाशी पक्क केलेल्या या सर्व कामगारांना कोरोनाची भीती वाटत नसल्याचे दिसून आले. तसेच त्याचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या गोष्टीचाही त्यांना विसर पडला होता. अनेक कामगारांनी पायी चालत गावचा रस्ता धरल्याने रस्त्यांवर टोळक्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना घरी पोहोचवण्यासाठी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवरील भागात २०० बसेसची व्यवस्था करण्यात आली. या बसेस गाझियाबाद आणि नोएडा या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. सर्वात जास्त लोक दिल्लीमधून बाहेर पडत आहेत. 

लोक शेवटी पायीच निघाले...

गेल्या दोन दिवसांत घरी जाण्यासाठी हजारोंच्या संख्येत लोक वाहनांच्या शोधात बाहेर पडत होते. राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून टोळके रस्त्यावरून चालत निघाल्याचे दिसताच सरकारने त्यांना गावी पोहोचवण्यासाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी गाजीपूर बॉर्डर आणि धौलाकुआँ या भागात हजारोंच्या संख्येत लोक जमा झाले होते.

Web Title - marathi news peoples don not have seriousness about corona. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live