ऐकावं ते नवलंच! दारु मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत लोक...

corona
corona

तिरुवनंतपुरम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच केरळमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. केरळमध्ये दारुच्या तुटवड्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता या काळात सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शनिवारी मल्लपूरम जिल्ह्यात दोन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे या संख्येत अधिक भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात केरळमध्ये सरकारला, या समस्येलाही तोंड द्यावं लागणार आहे.

दारुशी निगडीत असणाऱ्या सर्व रुग्णांसाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मानसोपचार तज्ज्ञांची मतं घेत आहोत. गरजेनुसार या रुग्णांना तालुका किंवा जिल्हा पातळीवरील रुग्णालयात आणता येईल, यासाठी प्रत्येक रुग्णालयात २० बेड स्वतंत्र ठेवण्यात आले असल्याची माहिती केरळ सरकारकडून देण्यात आली आहे.

Web Title: Peoples sucide becuase lack of alcohol

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com