परवानगी असो किंवा नसो आम्ही आजपासून मशिदी उघडणार - इम्तियाज जलील

साम टीव्ही
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

सरकारची परवानगी असो वा नसो, आम्ही मात्र मशिदी सुरू करू असं वक्तव्य इम्तियाज जलिल यांनी केलंय. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन करण्यात येईल. तोंडाला मास्कही लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्याची सर्वच स्तरातून मागणी होत असताना आता एमआयएमनेही आक्रमक भूमिका घेतलीय. आम्ही आजपासून मशिदी उघडणार आहोत. त्याची सुरुवात औरंगाबादपासून होईल, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलंय. 

 

BREAKING | राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, वाचा काय असतील अटी...

ते आज दुपारी दीड वाजता शहागंज येथील मशिदीत नमाज अदा करुन, मशिद उघडणार आहेत. सरकारची परवानगी असो वा नसो, आम्ही मात्र मशिदी सुरू करू असं वक्तव्य इम्तियाज जलिल यांनी केलंय. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन करण्यात येईल. तोंडाला मास्कही लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले पाहा सविस्तर ...


संबंधित बातम्या

Saam TV Live