देशातललं सर्वात महाग पेट्रो मराठवाड्यात; नांदेडमध्ये तर 92 रुपये प्रतिलिटर 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

नांदेडच्या एका तालुक्यात पेट्रोल तब्बल 92 रुपयांवर पोहोचलंय. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलनं नव्वदचा आकडा पार केलाय. 

गेले काही दिवस सातत्यानं देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढविले जात आहेत. यात कंपनींच्या दारापासून ते ग्राहकांच्या वाहनापर्यंत तेलाचा दर जवळजवळ दुप्पट होतो. यामध्ये अबकारी कर, राज्य सरकारांचा कर, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमीशन समावेश असतो. यामुळे देशात सर्वाधिक महागडे पेट्रोल मराठवाड्यात परभणीत मिळते आहे. त्याखालोखाल नांदेड आणि लातूरचा क्रमांक लागतो. परभणीत सगळ्यात महाग म्हणजेच तब्बल एका लीटरसाठी तब्बल 91 रुपये 30 पैसे इतकी किंमत मोजावी लागतेय.

तर, तिकडे  लातुरात एक लीटर पेट्रोलची किंमत 90 रुपये 12 पैसे इतकी झाली आहे. दरम्यान हिंगोलीत पेट्रोल 90 रुपये 21 पैशांवर पोहोचलंय.  नांदेडमध्ये पेट्रो प्रतिलिटर 90.43 रुपये, तर बीडमध्ये 90.51 रुपये प्रतिलिटर किंमतीनं पेट्रोल विकलं जातंय. दरम्यान औरंगाबादेत पेट्रोलची किंमात आहे 90.55 रुपये, तर उस्मानाबादेत पेट्रोलची किंमत आहे 89.83 इतकी. त्यामुळे आता वाढत्या इंधनाच्या दरांमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live