पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं 

साम टीव्ही
शनिवार, 13 जून 2020

 

  • पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं 
  • आठवड्याभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 रूपयांची वाढ
  • इंधनासोबत जिवनावश्यक वस्तूही महागणार 

कोरोनासंकटाशी झुंजताना आधीच लोकांच्या नाकीनऊ आलेत. अनेकांचा रोजगार बुडालाय. त्यात आता भर पडलीय ती इंधन दरवाढीची...पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढतायेत. गेल्या सहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेल जवळपास 4 रुपयांनी महागलंय. इंधनाचे दर वाढले की जिवनाश्यक वस्तू महागणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे येत्या काळात भाजीपाल्यासह, किराणा तसच इतर आवश्यक वस्तू महागण्याची शक्यता आहे. या महागाईचा थेट परिणाम सर्वसमान्यांच्या खिशावर होईल. 

  • मुंबईत पेट्रोलचा दर 82 रूपये 10 पैसे इतका झालाय. तर एक लिटर डिझेलसाठी 72 रूपये 03 पैसे मोजावे लागतील. 
  • पुण्यात प्रतिलिटर पेट्रोलचा दर 81 रूपये 84 पैसे इतका झालाय. तर डिझेलसाठी
  • 70 रूपये 71 पैसे मोजावे लागतली.
  • पेट्रोल - 82.51 प्रति लिटर
  • डिझेल - 71.34 प्रति लिटर
  • नागपुरात पेट्रोलचा दर 82 रूपये 58 पैसे इतका आहे. इथं डिझेलसाठी 72 रूपये 56 पैसे मोजावे लागती. 
  • जागतिक बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचा भाव एका टक्क्यानं वधारलाय शिवाय डॉलरच्या तुलनेत रूपयांची घसरण झालीय त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झालीय. भरीस भर म्हणजे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी देशातील बहुतांश राज्यांनी इंधनावर जादा अधिभार टाकलाय. कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य जनता आधीच पिचली गेलीय. एकीकडे रोजगार नाही दुसरीकडे कोरनाची भीती...अशातही कसाबसा संसाराचा गाडा हाकायचा म्हंटला तर त्यावर महागाईचा मार त्यामुळे आता या इंधन दरवाढीवर सरकारनेच तोडगा काढणं आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live